सांगली | गेली चार दिवस कुठे होता?, असा सवाल करत स्थानिकांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुखांना घेरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सांगली कोल्हापूरात महापूर आला आहे. हजारो लोकं पूरात अडकले आहेत. अद्यापही सर्व लोकांपर्यंत मदत पोहोचली नसल्याचं स्थानिकांनी सांंगितलं आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांपर्यंत मदत पोहचवण्यात प्रशासनाने विलंब केला. बचावकार्यांच्या बोटी कमी असल्याने हजारो लोक अद्याप पूराच्या पाण्यात अडकलेले आहेत, असा आरोप करत स्थानिकांनी महाजन आणि देशमुखांना घेकलं आहे. तुम्ही यात्रा काढत आहात. तुमची यंत्रणा चुकीची आहे. आम्हाला तुमची मदत नको. आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दात स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे.
