राज्यात आणखी 96 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई : कोरोना विषाणूने जगभरासह देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा फटका आता पोलिसांना देखील बसत आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढतच आहे. राज्यभरातील बाधित पोलिसांचा आकडा 714 वर पोहोचला आहे. तसेच आज आणखी 96 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसात 257 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये 81 अधिकाऱ्यांना आणि 633 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here