दाभोळ : दाभोळ परिसरातील वणौशी येथील तरुण कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार दाभोळ पंचक्रोशीत जनजागृतीसाठी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी रॅली काढली. या रॅलीचा प्रारंभ दाभोळ धक्का येथून झाला. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, जे कायद्याचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा दिला. दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक दीपक कदम, कर्मचारी स्वप्नील पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जाधव, सिद्धेश गायकवाड, प्रकाश चव्हाण यांच्यासह पोलिस मित्रही या रॅलीत सहभागी झाले होते.
