मुंबई : विधान परिषदेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये धुसफूस सुरू असतानाच मित्रपक्षांनीही नाराजीचा सूर आळवला आहे. रिपब्लिकन पक्षाला एकही जागा न मिळाल्यानं रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘भाजपनं रिपाइंला एक जागा द्यावी, अशी आमची मागणी होती. मात्र, ही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळं आमचे कार्यकर्ते नाराज आहेत,’ असं आठवले यांनी म्हटलं आहे.
