पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बीसीजी लसीची पहिली चाचणी येणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाला याबाबतची मान्यता मिळाली आहे. बीसीजी लस कोविड 19 च्या उपचारात काय भूमिका बजावते याबाबत संशोधन सुरु आहे, त्यासाठीचं ही चाचणी घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून या लसीची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मध्यम स्वरुपातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची निवड केली जाणार आहे. या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांवर या काळात विशेष लक्ष दिले जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:33 PM 09-May-20
