रत्नागिरी : आज सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार मंडणगड येथे 11 आणि कळंबणी अंतर्गत 2 अशा एकूण 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंडणगड येथे 11 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व अकरा जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे यातील 9 जण पंदेरी या गावातील असून एक म्हाप्रळ व पालवणी एक आहे. कळंबणी अंतर्गत जे 2 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यांना लवेल येथे क्वारंटाइन खाली ठेवण्यात आले होते. या दोघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. एकंदर जिल्ह्यात येणारे मुंबईकर रत्नागिरीसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:00 PM 09-May-20
