बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून

0

◼️ दहावीची परीक्षा २ मार्चपासून : परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे.

अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अपलोड केले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी.

अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्अॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही मंडळाने म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 31-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here