मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आव्हाड आता कोरोनामुक्त झाले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. आव्हाड सध्या आपल्या घरी विश्रांती घेताहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती स्वतः त्यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलं होतं. त्यानंतर आव्हाडांना अचानक ताप आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकीही एकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. ठाणे नगरपालिकेचे पीआरओ संदीप मालवी यांनी सांगितल्यानंतर, आव्हाडांचे स्वॅब सॅँपल चाचणीसाठी पाठवले होते. रिपोर्ट आल्यानंतर आव्हाडांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते. पहिल्यांदा त्यांना ज्युपिटर रुग्णालयात आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
