माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीस्थित एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.
त्यांना छातीत दुखू लागल्याची बातमी ANI वृत्तसंस्थेने दिली आहे.
काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. तसंच त्यांनी डॉ. सिंग यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
