नवी दिल्ली : देशातील टाळेबंदीचा तिसरा टप्पा या आठवडय़ाअखेर संपत असताना कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच पुढील उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ३ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. आताचे निर्बंध १७ मे रोजी संपत असून, त्यानंतर ते वाढवावेत की मागे घ्यावेत, यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला त्यातून मुक्त करण्यासाठी येणाऱ्या काळात कोणती पावलं उचलावी लागतील, याची चर्चा देखील अपेक्षित आहे. एकंदरितच कोरोनाच्या या संकटकाळात आजची बैठक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
