मुंबई : येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उतरले आहेत. आज मुख्यमंत्र्यांसह सर्वच उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. आज महाविकास आघाडीचे 5 उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसने ऐनवेळी दुसरा उमेदवार देखील उभा केला होता. मात्र निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी हा उमेदवार पुन्हा कमी करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.
