महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा २६ एप्रिलला

0

पुणे : इयत्ता आठवी, नववी आणि दहावीची महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा २६ एप्रिल रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे. या परीक्षेकरिता अर्ज भरण्यासाठी २१ जानेवारी २०२३ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे, असे विद्यार्थी तसेच त्यांच्या शिक्षक व पालक यांच्याकरिता ऑनलाइन किंवा संस्थेच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध होणार आहेत. या परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी मानद संचालक, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, वाडिया महाविद्यालय येथे संपर्क साधावा. तसेच ‘www.mtsexam.org’ या संकेतस्थळावर आणि ‘ctsewadia@gmail.com’ या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षेचे मानद संचालक डॉ. अभिजित लिमये यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:32 02-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here