हापा-मडगाव एक्स्प्रेसला जादा डबा

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना नववर्ष स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांची गर्दी झाल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या हापा -मडगाव एक्स्प्रेसला ४ ते २५ जानेवारी या कालावधीसाठी तर मडगाव हापा फेरीसाठी ६ ते २७ जानेवारी या कालावधीसाठी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे.

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. नियमित गाड्यांना तिकीटे मिळणे अवघड झाल्याने रेल्वेने यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त डबे जोडण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार हापा – मडगाव एक्स्प्रेसला जादा डबा जोडला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:06 02-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here