रत्नागिरी : बाहेर गावाहून आलेल्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तपासणीसाठी एकूण ३३६९ स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. यापैकी ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, २२०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही १,१२३ जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत.
