काँग्रेस १ जागा लढविणार; विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार

मुंबई : विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने २ उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. अखेर काँग्रेसने १ जागा लढवण्यास तयारी दाखवल्याने आता महाविकास आघाडी ५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. संख्याबळ नसतानाही विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागा लढवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळं महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. करोनाच्या संकटकाळात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील असताना काँग्रेसनं परस्पर दोन उमेदवार जाहीर केल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते. महाराष्ट्र करोनाचा सामना करत असताना निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसची मनधरणी केल्यानंतर काँग्रेसने १ जागा लढवण्याचा निर्णय घेत माघार घेतलीय.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here