रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाविषयक तपासणीसाठी आतापर्यंत ३,३६९ जणांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी २,२०७ अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आणखी १,१२३ अहवालांची अद्यापही प्रतीक्षा आहे. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात २,१०४ जण होम क्वॉरंटाइन आहेत.
