
मुंबई : मुंबईभोवती कोरोना विषाणूचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होत आहे. गेल्या २४ तासात १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ८७५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १३,५६४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
