नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या संगमेश्वर थांब्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन

0

संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड स्थानकात नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा मिळण्यासंदर्भात आज राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या शिष्टमंडळाने मुंबईमध्ये भेट घेऊन पत्र देत त्यांचे या संदर्भातील प्रलंबित मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.

येत्या 26 जानेवारीला यासंदर्भात आमरण उपोषणाची हाक दिलेल्या आंदोलनकर्त्यांना आमदार सामंत यांनी आश्वस्त केले. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्रही दिले आहे.

यासंदर्भात संगमेश्वरवासीयांच्या वतीने आंदोलनाची हाक दिलेले पत्रकार संदेश जिमन व त्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेतली.

संगमेश्वर तालुका हा आपल्या मतदारसंघात असून पर्यटनाच्या दृष्टीने हा तालुका महत्त्वपूर्ण आहे. या तालुक्यात पर्यटन तसेच ऐतिहासिक अशी अनेक ठिकाणी आहेत. या सर्वाचा विचार करून नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा, अशी विनंती शिष्टमंडळाच्या भेटीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 04-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here