दापोलीत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने खबरदारी

दापोली : कोरोनाचे थैमान सुरू असतानाच दापोलीत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने दापोली नगरपंचायतीतर्फे खबरदारी म्हणून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. नगर पंचायतीने नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार डेंग्यूचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने नष्टे करणे गरजेचे असून त्यासाठी नागरिकांनी उपाययोजना करावी. डासाच्या अळ्या, अंडी नियंत्रणासाठी आठवड्यात एक दिवस पूर्णपणे कोरडा पाळा, नियमित पाणी साठवणूक करत असलेल्या टाक्या, भांडी कोरडी करून स्वच्छ घासून एक दिवस कोरडी ठेवावीत. पावसाचे पाणी साठून राहते, अशा वापरात नसलेल्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. कचरा आणि अडगळ साठू देऊ नये. परिसराची जास्तीत जास्त स्वच्छता ठेवावी. डेंग्यूची साथ फैलावू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन दापोलीच्या नगराध्यक्ष परवीन शेख, उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर, नगरपंचायतीचे स्वच्छता समितीचे सभापती मंगेश राजपूरकर आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here