मोफत बस प्रवास सेवा स्थगित

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा मोफत द्यायची की सशुल्क यावरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर आता सोमवारपासून सुरू होणारी सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आदेशाचे गोंधळ कायम असल्याचे दिसून येते. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजूर, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. ही सेवा काही कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून येत्या काही दिवसांत सेवेबाबत निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली. दरम्यान, एसटीची कोणतीही सोय सुरू नाही, असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील बोरिवली येथील नेन्सी कॉलनी आगारात आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळं एसटी कर्मचारी आणि गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here