रत्नागिरी : परजिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्यांना त्यांची तपासणी करून व स्वाब घेऊन क्वॉरंटाईन केले जात आहे. कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना अहवाल येईपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने सक्तीने क्वॉरंटाईन केले जात आहे. यापूर्वी एमआयडीसी रेस्ट हाउस, काही शाळा व वसतिगृह यांचा वापर क्वॉरंटाईन करण्यासाठी केला जात होता. मात्र आता जिल्ह्यात येणाऱ्या वाढत्या संखेमुळे लॉजमध्ये क्वॉरंटाईन करण्याचा पर्याय देखील काल पासून खुला करण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाने शहरातील विविध लॉज ताब्यात घेतली आहेत. या पर्यायानुसार ज्यांना कुणाला लॉज मध्ये क्वॉरंटाईन व्हायचे आहे त्यांना लॉजचे भाडे भरून या ठिकाणी क्वॉरंटाईन होता येणार आहे. इतर ठिकाणांच्या तुलनेत लॉजमध्ये सुविधा चांगल्या असल्याने काहीजण हाच पर्याय निवडताना दिसत आहेत. मात्र काही लॉज चालकांनी प्रशासनाच्या या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त केली आहे. एखाद्या क्वॉरंटाईन केलेल्या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर आमचे संपूर्ण लॉज सील करून आम्हाला देखील क्वॉरंटाईन केले जाईल अशी भीती लॉजचालकांना सतावत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
02:55 PM 11/May/2020
