आई आधार केंद्रातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

0

◼️ 5 ते 7 गटात स्वरांगी जोशी प्रथम

◼️ 8 ते 10 गटात पार्थ ब्रीद प्रथम

रत्नागिरी : आई आधार केंद्र व ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी आयोजित कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुरुवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात पार पडली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन प्रतिवर्षी इयत्ता 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी वयोगटातील आई आधार केंद्रातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हि स्पर्धा जिल्ह्यातील विदयार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आली. आई आधार केंद्रातर्फे दरवर्षी गरजू गुणवंत मुलांना सढळ हस्ते मदत केली जाते. आईची महती व आईचे आपल्या जीवनातील स्थान किती महत्वाचे आहे हे आई आधार केंद्राचे संस्थाध्यक्ष श्री. वासुदेव तुळसणकर यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

या वेळी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.

8 ते 10 गट

प्रथम -पार्थ केतन ब्रीद-
सौं. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवली

द्वितीय -स्वरा महेंद्र साळवी
कै. एकनाथ इंग्लिश मेडीयम, लांजा

तृतीय -बिलवा गणेश रानडे
जी. जी. पी. एस स्कूल, रत्नागिरी

5 ते 7 गट

प्रथम -स्वरांगी प्रमोद जोशी
युनाइटेड ई. स्कूल. चिपळूण

द्वितीय -आर्या उदय यादव
आदर्श विद्यामंदिर, वाटुळ

तृतीय -भार्गवी अमेय गोखले
रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी

या वेळी व्यासपीठावर संस्था श्री. सूर्यकांत सुतार, श्री. शैलेश शिंदेदेसाई श्री.एकनाथ मोंडे श्री. चंद्रकांत जाणसकर परीक्षक मुख्याध्यापक श्री. तानाजी शिंदे उपस्थित होते

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुतार सूत्रसंचालन व आभार श्री. विनोद मिरगुले यांनी मांडले.

हा कार्यक्रम यशशवी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 05-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here