…म्हणून आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा निर्णय स्थगित : परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या तरी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही वाहतूक टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोधाचा सूर उमटल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागल्याचे परब म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. सुरुवातील ग्रीन झोन संदर्भातील विचार होणार असून रेड झोन संदर्भात सध्या विचार नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मुंबई, पुण्यातून लवकर एसटी सेवा सुरु होण्याची शक्यता सध्या दिसत नाही.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here