ब्रिटनने वाढवला 1 जूनपर्यंत लॉकडाऊन

लंडन : देशावर आलेले कोरोना संकट हे लवकर संपणार नसल्यामुळे देशातील 1 जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात येत असून लॉकडाऊन सुलभ करण्यासाठी सरकार काही योजनांवर काम करत असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सांगितले आहे. जॉनसन पुढे म्हणाले की, देशात लागू असलेला लॉकडाऊन या आठवड्यात संपवता येणे शक्य नाही. त्याऐवजी लॉकडाऊनच्या उपायांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आम्ही पाऊले उचलत आहोत. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी पाच स्तरीय अ‍लर्ट सिस्टम ठेवली आहे. ज्याचा उपयोग वैज्ञानिक डेटाद्वारे व्हायरसच्या प्रसाराच्या प्रमाणावर नजर ठेवण्यासाठी सरकार करणार आहे. आपल्या अलर्ट सिस्टमच्या ‘लेव्हल’ विषयी बोलताना बोरिस जॉनसन म्हणाले की, लेव्हल 1 चा अर्थ असा आहे की हा आजार ब्रिटनमध्ये अस्तित्त्वात नाही. पातळी 5 सर्वात गंभीर आहे. लॉकडाऊन दरम्यान आम्ही पातळी 4 मध्ये आलो आहोत आणि सर्वांचे धन्यवाद. कारण आता आपण पातळी 3 मध्ये प्रवेश करण्याच्या स्थितीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here