महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही : चित्रा वाघ

0

मुंबई : उर्फी जावेद प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना टार्गेट केलेय. चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यासंदर्भात चित्रा वाघ म्हणाल्या की, उर्फी जावेद प्रकरणामध्ये महिला आयोगाने स्वतःहून दखल घेऊन केस चालवणे अपेक्षित होते. परंतु, महिला आयोगाने उर्फीला सॉफ्ट कॉर्नर दिल्याचा आरोप वाघ यांनी केला. मुंबईत महिला उघडी-नागडी फिरत असतांना प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. अश्लील, घाणेरडे, ओंगळवाणे व्हीडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगत वाघ यांनी महिला आयोगाच्या दुटप्पीपणाचा पुरावा सादर केला. महिला आयोगाने ट्विटरवच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप नोंदवला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचे ते पोस्टर होते. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवल्याचे वाघ यांनी सांगितले.

या पोस्टरमुळे समाजात धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन, असा चुकीचा संदेश जात असल्याने जनमानस आणि समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असल्याचे आयोगाने नमूद केले होते. परंतु, दुसरीकडे उर्फी जावेद रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोगाला काहीच कसे वाटत नाही..? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित करुन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे वाघ यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:59 05-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here