जेएसडब्ल्यू कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन

0

रत्नागिरी : जेएसडब्ल्यू उद्योग समूह आणि रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्यावतीने जिल्हास्तरीय अॅथलेटीक्स जेएसडब्ल्यू कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धा रविवार दि. २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. जेएसडब्ल्यू उद्योग समूहाच्यावती प्रतिवर्षीप्रमाणे जिल्हास्तरीय जेएसडब्ल्यू कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

एकूण १० गटात ही स्पर्धा होणार असून, प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा १० किमी.- जेएसडब्ल्यू कर्मचारी, १० किमी. – पुरुष व महिला, ५ किमी. १८ वर्षाखालील मुले मुले व मुली ( २३.१.२००५ नंतर जन्मलेले), किमी. १६ वर्षाखाली मुले व मुली (२३.१.२००७), ३ किमी. – १४ वर्षाखालील मुले मुली (२३.१.२००९ नंतर जन्मलेले). ३ किमी – ड्रीम रन फक्त जे एस डब्ल्यू ग्रुप अशा १० गटात होणार आहे. स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी ते भाट्ये या मार्गावर होणार वआहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 06-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here