उद्योगांचे स्वागत करण्यास महाराष्ट्र उशिर का करतोय : आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आहे. अशात उद्योगांचे स्वागत करण्यास महाराष्ट्र उशिर का करतोय? असा प्रश्न भाजपानेते आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला आहे. चीन सारख्या देशातून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र उशिर का करतोय? राज्याच्या अर्थकारण, रोजगार या दुष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला केवळ एक कमिटी गठीत करुन ‘शासकीय लाल फितीत’ का गुंडाळून ठेवताय? तातडीने निर्णय का घेत नाही, असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थितीत केले आहेत. केंद्र सरकारने या बदलत्या परिस्थिती नुसार तातडीने बदल आणि नवी धोरणे आखायला सुरुवात करताच उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांनी जुने कायदे बदलण्यात आघाडी घेतली. सध्याचे उद्योग टिकतील व नवे उद्योग आकर्षीत होतील असे नवे धोरण व पोषक वातावरण तयार करण्यास सुरुवात केली असल्याचं देखील सांगितले. वास्तविक महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत म्हणून ओळखले जाते, अशावेळी महाराष्ट्र सर्वात आधी पुढाकार घेते. पण यावेळी महाराष्ट्राने याबाबत उशीर केल्याचं आशिष शेलार यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here