रत्नागिरी : कोरोनाबाधित क्षेत्र (Containment Zone) घोषित करण्याचे अधिकार आता उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हे अधिकार आतापर्यंत केवळ जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनाच आहेत. मात्र कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या आणि त्याबाबतचे कामकाज शीघ्रगतीने व्हावे, यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी आता ते अधिकार संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे ते काम जलदगतीने होईल. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना तात्काळ हाती घेता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
