राजकीय निर्णय घेणार पण कोरोना संकट टळल्यावर : एकनाथ खडसे

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काहीसे नाराज झाले आहेत. याबाबत एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. कोरोनाच्या संकटानंतर राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर माझं नाव या यादीत नसल्याचे समजले. यानंतर भाजपाच्या असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांचे मला फोन येत आहेत. भाजपामध्ये राहण्याबाबत काहीतरी निर्णय घ्या, असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या संकटकाळात कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही, पण कोरोनाच्या संकटानंतर आपण राजकीय निर्णय घेणार आहे, असे खडसे म्हणाले. यावेळी खडसेंनी मला इतर पक्षातून ऑफर येत असल्याचंही सांगितलं. मात्र मी नेहमी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. मी चाळीस-बेचाळीस वर्षे भाजपामध्ये काम करत आहे. यावेळी विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती मिळू शकली नाही, असेही खडसे शेवटी म्हणाले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here