सातारा : सातारा कारागृहातील कोरोनाबाधीत कैद्यांची संख्या नऊ झाल्याने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. इतर कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने कारागृहातील 15 कैद्यांना हलविण्यात आले आहे. येथील यशोदा क्वारंटाईन सेंटरमध्ये या कैद्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुणे येथून 48 कैदी सातारा कारागृहात पाठविण्यात आले होते. त्यातील सुरुवातीला 2 कैद्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे कारागृहासह परिसर व शहरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर लगेचच दोन व नंतर पाच कैदी करोनाबाधित झाल्याचे समोर आले. आता कारागृहातील करोनाबाधित कैद्यांची संख्या नऊ झाली आहे. त्यामध्ये पाच महिला कैद्यांचा समावेश आहे. त्यामुळे कारागृहासह शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
