गावखडी, मालगुंड, माडबन किनाऱ्यालगत ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरटयांचे सवंर्धन

0

रत्नागिरी : रत्नागिरी वनपरिक्षेत्र अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील येणाऱ्या समुद्रकिनाऱ्यालगत मौजे गावखडी, मालगुंड तसेच राजापूर तालुक्यातील मौजे वेत्ये व माडबन या ठिकणी ऑलिव्ह रिडले कासव अंडी संवर्धनाचे काम वनविभागामार्फत सुरु करण्यात आलेले आहे.

मौजे गावखडी येथे दिनांक १२ / १२ / २०२२ रोजीच्या ०९ घरटयामध्ये १२७ अंडी आढळली व दिनांक ०२/०१/२०२३ रोजीच्या ०१ घरटयामध्ये १५१ अशी एकुण ०२ घरटयांमध्ये २७८ कासवाची अंडी आढळली आहेत.

माडबन येथे दिनांक १२ / १२ / २०२२ रोजीच्या एका घरटयामध्ये एकुण १२४ कासवांची अंडी आढळली आहेत. तसेच मालगुंड येथे दिनांक ०२ / ०१ / २०२३ रोजीच्या एका घरटयामध्ये एकुण १०८ कासवांची अंडी आढळली आहेत.

त्याप्रमाणे रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील समुद्रकिना-यालगत एकुण ०४ घरटयांमधुन ५१० कासवाची अंडी आढळली आहेत. सदरची ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी वनविभागामार्फत संरक्षित केलेली असून सुमारे ५५ ते ६० दिवसानंतर सदर संरक्षित अंडयामधुन पिल्ले बाहेर येणार आहेत.

याबाबत श्री. दिपक खाडे विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) व श्री. सचिन निलख मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), रत्नागिरी (चिपळूण), यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी, व त्यांचे अधिनस्त श्री एन. एस. गावडे वनपाल पाली, श्री संदानद घाटगे वनपाल राजापूर, श्री. प्रभू साबणे वनरक्षक रत्नागिरी, श्रीम. शर्वरी कदम वनरक्षक जाखादेवी व श्री सुरज तेली वनरक्षक राजापूर तसेच कासव मित्र श्री प्रदीप डिंगणकर मालगुंड व श्री ऋषिराज जोशी यांच्या मदतीने सदरचे कार्य चालू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 07-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here