राजकीय नेता होण्यामागे पत्रकार, वृत्तपत्रांचा मोठा वाटा : राजन साळवी

0

लांजा : राजकीय मंडळी काम करीत असताना चुकत असतात. या चुका लेखणीच्या माध्यमातून दाखविण्याचे काम पत्रकार करतात. परंतु, असे असले तरी राजकीय नेता होण्यामागेही पत्रकार आणि वृत्तपत्रांचाच मोठा वाटा असतो.

लांजा तालुका पत्रकार संघ सामाजिक लेखणीबरोबरच बांधिलकीची जपणूक करत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे आमदार राजन साळवी म्हणाले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून लांजा तालुका पत्रकार संघ व कल्पना कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. ६) लांजा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम, पोलिस निरीक्षक दादासाहेब घटकडे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम तथा भाऊ वंजारे, अध्यक्ष जयवंत शेट्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप मुजावर, कल्पना कॉलेजचे संस्थापक मंगेश चव्हाण, तालुकाप्रमुख संदीप दळवी, माजी नगरसेवक शेखर सावंत, लांजा राजापूर नागरी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड उपस्थित होते.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापूर म्हणाले की, देशात सध्या हुकूमशाही पद्धतीची वाटचाल सुरू आहे. अशा गोष्टीवर पत्रकारांनी सडेतोड लिखाण केले पाहिजे. सध्याची पत्रकारिता थंड पडलेली आहे. परंतु, ते देशासाठी घातक असून, पत्रकारांबाब सर्वांना आदरयुक्त भीती वाटते ती भीती अशाच पद्धतीने वाटली पाहिजे असे पत्रकारांनी काम केले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नासा व इस्रो पाहणीसाठी निवड झालेल्या आशिष गोबरे, वेदिका वारंगे, आर्यन गुरव यांच सत्कार करून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच श्रुतिका शिंदे दिव्या भायजे, नम्रता पाटोळे, मयूर नरसळे, अक्षता घाडी, दुर्वा चव्हाण लतिका जाधव, वृषाली घाणेकर यांना व्यावसायिक शिक्षणात उज्ज्वल य‍श मिळविल्याने गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी अनिल कासारे रिजवान मुजावर, इकबाल गिरकर समीर सावंत, अदनान मुजावर, मंगेश‍ चव्हाण, प्रणिता बोडस यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 07-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here