सातारा : फलटण येथील रहिवासी राज्य गुप्त वार्ता विभागाचे निवृत्त अप्पर उपायुक्त अरविंद गुलाबराव माने (वय, 65 रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी पहाटे तीन वाजता घराच्या गच्ची वजा टेरेसवर छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्या मोठ्या भावाने फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली आहे. प्रथमदर्शनी पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन व चौकशीवरुन दिसून येत आहे. त्यांनी कुंडल, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर येथे पोलीस दलात काम केले आहे. सातारा येथे ते राज्य गुप्त वार्ता विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. पुणे येथील ट्रेनिंग सेंटरचे इनचार्ज म्हणून अप्पर उपायुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली. तेथेच ते सेवानिवृत्त झाले. अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गिरी करीत आहेत.
