देवरूख : येथील पांगरीतील ७२ वर्षीय महिलेने राहत्या घरी स्वतःचा अंगावर रॉकेल ओतून मुत्यूला आमंत्रण दिले. पतीच्या निधनामुळे आलेल्या नैराश्येतून एका वृध्देने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गेरेवाडी येथे शुक्रवारी रात्री घडली. देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शोभा यशवंत कांबळे (वय ७२ वर्षे) असे या वृध्देचे नाव आहे. यात त्या गंभीररित्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय सुत्रांनी तपासणी करून कांबळे यांना मृत घोषित केले. याबाबत सूर्यकांत कांबळे यांनी देवरूख पोलिस ठाण्यात खबर दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
