
नवी दिल्ली : ८७ वर्षीय डॉ. सिंग यांना रविवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. एम्समध्ये उपचार घेत असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग याची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सच्या सूत्रांनी सांगितले. डॉ. सिंग हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या तपासण्या सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.
