रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर कोगजे वाठार (निवळी) येथे रविवार (दि. १०) रस्त्याकडेला ट्रक उलटून दोघेजण जखमी झाले. रविवारी सकाळी रत्नागिरी येथून ट्रक (आरजे-१९-जीजी-५६५५) हा मुंबईकडे चालला होता. दहा वाजण्याच्या दरम्यात तो कोगजे वाठार येथे आला असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो उलटला. त्यात रामदिन बाबूलाल तिलवेसनी (वय २२) व दिनेश हरिराम निवेसनी (वय ३२, रा. जोधपूर, राजस्थान) हे दोघे जखमी झाले. श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेतून त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
