ब्रेकिंग : आज जिल्ह्यात आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

रत्नागिरी : आज सायंकाळी 7 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि एक अहवाल अपुरा नमुना असल्याने प्राप्त होऊ शकला नाही. आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 2 रुग्ण रत्नागिरी येथील नर्सिंग सेंटर मधील आहेत. तर एक रुग्ण रत्नागिरी परिसरातील येथील रहिवासी आहे. याव्यतिरीक्त लांजा येथील 2 लहान मुलांचा (वय 9 व 10 वर्षे) अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्हयातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 47 झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
07:10 PM 11/May/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here