जिल्ह्यातील ३२ हजार ३९८ बागायतदारांनी उतरवला विमा

0

रत्नागिरी : यावर्षी विमा उतरविणाऱ्या बागायदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

यंदा ३२ हजार ३९८ आंबा व काजू शेतकऱ्यांनी विम्याचे कोंदण स्वीकारले आहे. त्यात २६ हजार ५१८ आंबा बागायतदार आहेत. सर्वाधिक प्रतिसाद रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मिळाला.

वातावरणात होणारे सातत्याने बदल, पावसाची अनिश्तितता त्यामुळे बागायतीवर आणि उत्पनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांमध्ये विमा सुरक्षा घेण्याकडे कल वाढू लागला आहे. गतवर्षी विक्रमी ९४ कोटी ४१ लाख विमा परतावा शेतकऱ्यांना मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत सव्वासहा हजार बागायतदारांनी विमा योजनेला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात एकूण ६५ महसुली मंडळे असून, त्यात पंधराशेहून अधिक गावे आहेत. गतवर्षी २६ हजार ६११ बागायतदारांच्या १४७३२.८९ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरविला होता.

त्यात २२ हजार ३८० आंबा बागायतदार तर ४ हजार २३१ काजू बागायतदार होते. यंदा विमा उतरवणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यंदा एकूण ३२ हजार ३८९ शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. त्यातील २६ हजार ५१८ आंबा तर ५ हजार ८८० काजू बागायतदार आहेत. विमा घेणार २८ हजार २५१ कर्जदार असून, ४ हजार १४७ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी २० कोटी ८५ लाख रुपये भरले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 10-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here