नवी दिल्ली : 17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्याआधी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे सहा तास चर्चा केली. पंतप्रधानांनी 15 मेपर्यंत सर्व राज्यांना ब्लू प्रिंट देण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधानांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला, त्यावेळी लॉकडाऊन 4 कसा असेल या मोठ्या प्रश्नाचे संकेत खुद्द त्यांनीच दिले. या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील आवश्यक उपायांची गरज नव्हती. अशाचप्रकारे तिसऱ्या टप्प्यातील आवश्यक उपाययोजनांची गरज चौथ्यामध्ये नाही, असं माझं मत आहे. या बैठकीत पंतप्रधान जे काही म्हणाले त्यावरुन लॉकडाऊन 4 चे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तसेच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही लॉकडाऊन वाढविण्याचीच मागणी केली आहे. मात्र लॉकडाऊन 4 ची अजून घोषणा झालेली नाही.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:08 AM 12-May-20
