मुंबई : कोरोना संकटकाळातही राज्याची अर्थव्यवस्था सक्षम राहावी यासाठी महाराष्ट्रात २५ हजार कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू झाले असून, या कंपन्यांमध्ये साडेसहा लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी दिली. रेड झोनवगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने दिले असून, २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. ‘मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी मेअखेर महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. घाई करू नये’, असे आवाहन देसाई यांनी केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:27 AM 12-May-20
