मुंबई : देशात सर्वाधित कोरोनाबाधितांचा आकडा महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून गेल्या 24 तासात 1230 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 23,401 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यात एकूण 868 जण कोरोनामुळे दगावले आहेत. एका दिवसात 587 रुग्ण बरे झाले असून राज्यात एकूण 4,786 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
