चीनच्या हेनान प्रांतात तब्बल 90 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण

0

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. सर्वच शहरं कोरोना संसर्गाच्या विळख्यात येत आहेत. याच दरम्यान, चीनच्या तिसऱ्या सर्वाधिक लोकसंख्येच्या हेनान प्रांतातील 90 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

HTML tutorial

हेनानच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत चीनच्या वुहान प्रांतात अशाच प्रकारे कोरोनाने कहर केला होता. जगात कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमधूनच आढळून आला होता.

न्यूज एजन्सी एएफपीनुसार, हेनान प्रांताच्या आरोग्य आयोगाचे संचालक कान क्वानचेंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 6 जानेवारी 2023 पर्यंत हेनानमध्ये कोरोना संसर्गाचा दर 89.0 टक्के होता. म्हणजेच, हेनानमधील 99.4 दशलक्ष लोकसंख्येपैकी (9.94 कोटी) 88.5 दशलक्ष म्हणजेच (8.84 कोटी) लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली होती. सततच्या विरोधानंतर चीनने गेल्या महिन्यात शून्य कोविड धोरण संपुष्टात आणले होते. तेव्हापासून चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेडच शिल्लक नाहीत. औषधांचाही मोठा तुटवडा आहे. बीजिंगसह अनेक प्रांतातून धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. येथील स्मशानभूमीवर मोठी रांग लागली होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागली. हे सर्व असूनही चीनने आपल्या सीमा पूर्णपणे खुल्या केल्या आहेत. एवढेच नाही तर चीनमधून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे नियमही रद्द करण्यात आले आहेत.

चीनवर कोरोनाची आकडेवारी लपवल्याचा आरोपही केला जात आहे. चीनचा दावा आहे की डिसेंबरपासून केवळ 1.2 लाख रुग्ण आढळले आहेत, तर 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीननेही कोरोनाच्या मृत्यूबाबत नियम बदलले होते. चीनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही कोरोना हे मोठे आव्हान असल्याचे मान्य केले होते. मात्र, एवढे करूनही चीन कोरोनाबाबत आकडेवारी देत ​​नाही. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालाने याचा पर्दाफाश केला आहे. WHO च्या साप्ताहिक अहवालानुसार, चीनमध्ये एका आठवड्यात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाची आकडेवारी जगापासून लपवण्यासाठी चीन काहीही करण्यास तयार आहे. प्रथम त्याने दैनंदिन आकडेवारी शेअर करणे बंद केले. आता असे समोर आले आहे की, कोरोनाचे सत्य लपवण्यासाठी चीनने डॉक्टरांवरही दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, मृत्यूचे कारण कोरोना व्हायरस म्हणून सूचीबद्ध करू नये यासाठी चीनमधील डॉक्टरांना सल्ला देण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार, बीजिंग रुग्णालयातील डॉक्टरांना मृत्यूचे प्राथमिक कारण म्हणून कोरोना व्हायरस संसर्ग असा रिपोर्ट करू नका असं सांगण्यात आलं आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि चीनमध्ये स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागल्याने लोकांना रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले जात असताना ही धक्कादायक बाब आता समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here