जिल्ह्यातुन मध्य प्रदेशातील मजूर पनवेलकडे बसने रवाना

रत्नागिरी : जिल्ह्यातील मध्य प्रदेशातील मजूर आपल्या गावी जाता यावे म्हणून वारंवार मागणी करत होते. अखेर या मजुरांची रवानगी रत्नागिरी एसटीने पनवेल पर्यंत करण्यात आली आहे. जिल्ह्यातुन 578 मजूर पनवेलकडे बसने रवाना झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजल्यापासून 30 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण येथील डेपोतून बसेस सोडण्यात येत आहेत. एका बसमध्ये 22 मजूर याप्रमाणे 30 गाड्या जिल्ह्यातून सुटत असल्याची माहितीही विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत या गाड्या मजुरांना सोडून येणार आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:34 PM 12-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here