Breaking: आमदार बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक

0

मुंबई : आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात झाल्याची घटना घडली आहे. त्यांना अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला आहे.

रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिल्यानं अपघात झाला. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर अमरावतीतल्या खासगी रुग्णालयात उचरास सुरु आहेत. दुचाकीनं धडक दिल्यानंतर बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.

कटोरा रोडवरील आराधना चौक जवळ आज सकाळी 6.15 वाजता बच्चू कडू रोड ओलांडताना एका दुचाकीने त्यांना धडक दिली ज्यात त्यांना इजा झाली. उजव्या पायावर आणि डोक्यावर मार लागल्याने डोक्यावर चार टाचे पडले आहे.सध्या रुग्णालयात कोणालाच एन्ट्री दिली जात नाही. दरम्यान, अपघातानंतर बच्चू कडू यांनी ट्वीट केलं आहे. रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला आहे. माझी प्रकृती ठीक असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया कोणाही भेटायला येऊ नये. अशी सर्व हितचिंतकांना बच्चू कडू यांनी विनंती केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 11-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here