रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची थर्मल स्कॅनर मशीनच्या सहाय्याने रोजच्या रोज आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. विशेषतः मुंबई व पुण्यातून येणाऱ्या चाकरमान्यांना याची लागण झाल्याचे सध्या स्पष्ट होऊ लागले आहे. सध्या प्रशासनातर्फे योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. शासकीय कार्यालयात ३३ टक्के कर्मचारी वर्गाची उपस्थिती ठेवण्यात आली आहे. जि.प. भवनात प्रत्येक विभागात येणारा कर्मचारी व अधिकारी तसेच नागरिकांची प्रवेशद्वारावरच थर्मल स्कॅनर मशीनच्या सहाय्याने रोजच्या रोज तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी करूनच कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर सॅनिटायझरच उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक टेबलावर सॅनिटायझर ठेवण्यात आला आहे.
