पतीने केले पत्नीवर तलवारीने वार

चिपळूण : तनाळी येथील तरुणाने पत्नीवर संशय घेत तलवारीने वार केले. यामध्ये ऐश्वर्या संतोष कातकर (वय ३०, तनाळी नवलेवाडी, ता. चिपळूण) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऐश्वर्या या आशा सेविका आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास तनाळी येथे घडली. याप्रकरणी आशा सेविकेचा पती संतोष दत्ताराम कातकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या कातकर या गावामध्ये जनजागृती करीत असत. त्यांच्याबाबत संशय व्यक्त करून पतीने हातावर, डोक्यात तलवारीने वार केले. यामध्ये ऐश्वर्या या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here