लवकरच केंद्र सरकार नवं पॅकेज देणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली : कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही याचा फटका बसला आहे. टाळेबंदीमुळे उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहे. कोरोनाच्या संकटात उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दिलासादायक पॅकेज जाहीर करणार आहे. सरकार येत्या दोन ते तीन दिवसांत नवं पॅकेज देणार असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री आणि एमएसएमई खात्याचे मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी दिली आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here