रत्नागिरी: पोलिस भरतीत १३१ पदांसाठी ४,८४३ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र

0

रत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या पोलिस शिपाई पदाच्या भरतीत १३१ पदांसाठी ४,८४३ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत. या पदासाठी एकूण ७,६९६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

रत्नागिरीत २०२१ मधील पोलिस शिपाई भरतीची प्रक्रिया २ जानेवारी ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत पार पडली. १३१ पदांसाठी झालेल्या या भरतीसाठी ७,६९६ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५,५३२ उमेदवार शारीरिक चाचणीकरिता हजर झाले. यातील ६८९ उमेदवार अपात्र ठरल्याने मैदानी चाचणीसाठी ४,८४३ उमेदवार पात्र ठरले आहेत.
ही भरती प्रक्रिया पारदर्शक तसेच सुरळीत पार पाडण्यासाठी रत्नागिरी पोलिस दलाद्वारे प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्याद्वारे भरती प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच प्रत्येक ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंग व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड मार्गदर्शन करत होते.

पोलिस भरतीतील उमेदवारांकडून प्रत्येक गुणपत्रकावर स्वाक्षरी घेण्यात येत होती. उमेदवारांसाठी ठिकठिकाणी माहिती फलकही लावण्यात आले होते. विविध शासकीय विभागांनी आणि विविध सेवाभावी संस्थांनी शारीरिक चाचणीदरम्यान पोलिस दलाला सहकार्य केले. या भरती प्रक्रियेत कोठेही अनुचित प्रकार किंवा गैरप्रकार घडल्याचे समोर आलेले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 12-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here