मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांना भरमसाठ शुल्क आकारु नये, खाजगी हॉस्पिटल्सनी जास्तीत जास्त खाटा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाजगी हॉस्पिटल्सच्या संचालकांना केल्या आहेत. खाजगी हॉस्पिटल्स रुग्णांना भरमसाठ शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी येत होत्या. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खाजगी हॉस्पिटल्सच्या संचालकांसोबत बैठक घेलती. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक पार पडली. हिंदुजा, लिलावती, नानावटी, सैफी, बॉम्बे अशा मोठ्या खाजगी हॉस्पिटल्सचे संचालक या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:34 PM 12-May-20
