राज्यात थंडीचा कडाका कायम

0

मुंबई : आजही (12 जानेवारी) राज्यात थंडीचा जोर कायम आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 10 ते 15 अंशाच्या असापास आहे.

तर काही ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली देखील आहे. विशेषत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळं राज्यात गारठा वाढला असून, थंडीची लाट कायम आहे. थंडीपासून बचावर करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.

मराठवाड्यात थंडीची लाट कायम

मागच्या 4 दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक शहरांचे तापमान हे 10 अंशाखाली गेल्याने सर्वत्र थंडीचा कडाका पडला पडला आहे. थंडी ही दिवसभर राहत असून यामुळेच सामान्यांना हुडहुडी भरत आहे. थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भाग असो की शहरी सर्वत्र शेकोट्या पेटत आहेत. तर दुसरीकडे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची संख्या ही कमी झाली आहे. एकुणच हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार थंडीची लाट ही येत्या काही दिवसात कायम राहणार असल्यानं नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

नाशिकमध्येही कडाक्याची थंडी

नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून किमान तापमानात घट झाली आहे. कडाक्याच्या थंडीनं नाशिककर चांगलेच गारठले आहेत. उबदार कपडे परिधान करून ते स्वतःचे रक्षण करत आहेत. तर दुसरीकडे मुक्या जीवांनाही थंडीने हुडहुडी भरत असून नाशिक पश्चिम वनविभागाच्या पक्षी वन्यजीव उपचार केंद्रातील पक्षांचा थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने इको इको फाउंडेशनच्या पुढाकाराने ईथे हिटर लावण्यात आले आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानूसार या केंद्रातील खोलीचे तापमान 28 अंशांपर्यंत स्थिर ठेवण्यात येते आहे. पिंजऱ्यात कोरडे गवत ठेवण्यात येऊन पिंजरे उबदार कपड्यांनी झाकण्यातही आले आहेत. सध्या 3 घुबड, 3 पोपट आणि नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या एका घारीवर उपचार सुरू आहेत.

पाहा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

सोलापूर – 14 अंश सेल्सिअस
सातारा – 10.8
नाशिक – 9.2
नांदेड – 12.4
कोल्हापूर – 14.9
जळगाव – 7
औरंगाबाद – 9.4
रत्नागिरी – 15.5
मुंबई (कुलाबा) 19.4
पुणे- 8.3
उस्मानाबाद – 10.4
परभणी – 12.5
नंदूरबार – 11.1
अहमदनगर – 10.5
अमरावती 10
अकोला 12
बुलढाणा 14
चंद्रपूर 13
गडचिरोली 11
नागपूर 11
यवतमाळ 11
वर्धा 11

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 12-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here